CBI ची नाशिक, नगरसह राज्यातल्या अन्य काही शहरांमध्ये छापेमारी Saam Tv
महाराष्ट्र

CBI ची नाशिक, नगरसह राज्यातल्या अन्य काही शहरांमध्ये छापेमारी

सीबीआयकडून (CBI) नाशिक, नगरसह (Nashik-Nagar) राज्यातल्या अन्य काही शहरांमध्ये छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: सीबीआयकडून (CBI) नाशिक, नगरसह (Nashik-Nagar) राज्यातल्या अन्य काही शहरांमध्ये छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. या छाप्यांसदर्भात अधिक माहिती समोर आलेली नसली तरी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित ही छापेमारी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याप्रकरणी चौकशी सध्या सुरु आहे. त्याअंतर्गत अधिक तपासासाठी हे छापे टाकण्यात आल्याचं बोललं जातं आहे.

या प्रकरणी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुणे, सांगली, संगमनेरमधील निवासस्थानी आणि अन्य मालमत्तांवर छापे टाकण्यात आलेत, तर या प्रकरणाशी संबंधित अन्य काही जणांच्या मालमत्तांवरही धाडी टाकण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. या छाप्यातून जी माहिती समोर येईल त्याआधारे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

भारतात पेट्रोल-डिझेल कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT