#Anil Deshmukh | देशमुखांच्या अडचणीत वाढ? Saam tv
महाराष्ट्र

ईडीच्या चौकशीस चकवा दिल्यास देशमुखांच्या अडचणी वाढणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुप्रीम न्यायालयाकडून दिलासा मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

सुरज सावंत

मुंबई : खंडणीचे आरोप आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुप्रीम न्यायालयाकडून दिलासा मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्यामुळे देशमुखांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

हे देखील पहा -

अनिल देशमुख यांनी ईडीकडून चाललेल्या कारवाई आणि चौकशी विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. देशमुखांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अनपेक्षितपणे सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ईडीला सामोरे जाण्याखेरीज देशमुख यांच्याकडे पर्याय उरला नाही.

तब्बल चार वेळा अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, चारही वेळा समन्स बजावून देखील देशमुख यांनी कोर्टातील याचिकेचा हवाला देत चौकशीला उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे आता पाचव्यांदा समन्स बजावून देखील जर देशमुख ईडीच्या चौकशीस सामोरे गेले नाहीत तर ईडीकडून देशमुखांभोवती फास आवळला जाऊ शकतो.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai-Pune : अंधाऱ्या बोगद्यातून वाट काढत पोहचा 'या' धबधब्यावर, मुंबई-पुण्याजवळच पाहाल हे आरस्पानी सौंदर्य

SCROLL FOR NEXT