Anil Bonde  SaamTv
महाराष्ट्र

Anil Bonde: लव्ह जिहाद प्रकरणात मेळघाटातील एका तरुणीचा बळी; अनिल बोंडे यांचा आरोप

लव्ह जिहादच्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले असताना एका आदिवासी तरुणीची लव्हजिहाद मधूनच हत्या झाल्याचा आरोप भाजपचे अनिल बोंडे यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - शहरात लव्ह जिहादच्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले असताना एका आदिवासी तरुणीची लव्हजिहाद मधूनच हत्या झाल्याचा आरोप भाजपचे अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला आहे. चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील 19 वर्षे युवतीला २० जुलै रोजी परतवाडा येथील शाहरुख उर्फ जकिर याने पळवून पुण्याला नेले.

गावात पंचायत बसल्यानंतर सदर मुलीला पुण्यात राहत असलेल्या आदिवासी युवकांच्या मदतीने 17 ऑगस्ट रोजी युवतीला गावात परत आणण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी जाकीर उर्फ शाहरुख त्याच्या मित्राला घेऊन गावात आला व मुलीला आपल्या दुचाकी वर घेऊन गेला.

हे देखील पाहा -

१९ ऑगस्ट रोजी रात्री गावातील विहिरीत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळला.परतवाडा येथील शाहरुख उर्फ जाकीर या तरुणाने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने माझ्या मुलीची हत्या केली अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र पोलिसांना या प्रकरणात कुठलीही कारवाई न केल्याने या बाबतची तक्रार खासदार बोंडे यांच्याकडे करण्यात आली.

चिखलदरा पोलीस या युवतीच्या हत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील अनिल बोंडे यांनी केलेला आहे. बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे तसेच या बाबीची तक्रार गृहमंत्री यांच्याकडे सुद्धा केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT