Amruta Fadnavis Case  saam tv
महाराष्ट्र

Aniksha Jaisinghani Case: अनीक्षा जयसिंघानी प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी घेतली शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावं

Amruta Fadnavis Case : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल केल्याच्या या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Chandrakant Jagtap

Amruta Fadnavis Blackmail Case: डिझानर अनीक्षा जयसिंघानी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल केल्याच्या या प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची नावी घेतली आहे.

अनीक्षा जयसिंघानीने देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते, असा दावा मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल करण्याच्या या कटात विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असा दावाही पोलिसांकडून करण्यात आला आहे. तसेच याची चौकशी करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. अनीक्षाच्या जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी हा दावा केला.

दरम्यान अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल प्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर झाला आहे, अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. अनिक्षाने तिचे वडिल अनिल जयसिंघानी यांच्यावरील फौजदारी खटला मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ केली असे या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (Latest Political News)

या प्रकरणात कोर्टाने सोमवारी संशयित बुकी अनिल जयसिंघानीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जयसिंघानीला गुजरातमधून चुलत भाऊ निर्मलसह अटक करण्यात आली होती. या दोघांना सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी. आल्मले यांच्यासमोर हजर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT