Gold Crown Donation to Saibaba saam tv
महाराष्ट्र

Shirdi Saibaba : साईबाबांच्या चरणी ३७ लाखांचा सोन्याचा मुकुट, आंध्रतील साईभक्ताची देणगी

शिर्डीतील साईबाबा देवस्थानात दर्शनासाठी आलेले भाविक नेहमीच दानधर्म करत असतात.

साम टिव्ही ब्युरो

मोबिन खान

शिर्डी : देशातूनच नव्हे तर जगभरातून लाखो भाविक शिर्डीतील साईबाबांच्या (Shirdi Saibaba) दर्शनासाठी येतात. साईचरणी नतमस्तक होऊन मनातील अध्यात्मिक भाव साईबाबांना अर्पण करत असतात. शिर्डीतील साईबाबा देवस्थानला दर्शनासाठी आलेले भाविक नेहमीच दानधर्म करत असतात. आंध्रप्रदेशातील बापटला येथील एका साईभक्ताने ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट (Gold Crown) साईचरणी अर्पण केला आहे. एवढच नाही तर ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताटही देणगी स्वरुपात दिलं आहे. अन्नम सतिष प्रभाकर असं या साईभक्ताचं नाव आहे. अन्नम ही देणगी साईबाबा संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

Gold Crown

शिर्डीच्या साईबाबांना सोन्याची आभुषणं देण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आंध्रप्रदेशातील बापटला येथील दानशूर साईभक्‍त अन्नम सतिष प्रभाकरने साईचरणी मोठी देणगी अर्पण केली आहे. जवळपास ३७ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट साईचरणी अन्नमने अर्पण केला आहे. त्याने दिलेल्या या देणगीची सर्वत्र चर्चा होत आहे. यापूर्वीही साईभक्तांनी सोन्याची आभुषणं साईचरणी अर्पण केली आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT