Akola Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime News : धक्कादायक! जागेच्या वादातून माजी सैनिकाने केली एकाची हत्या

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola News : अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोतखेड या दोनशे ते तीनशे लोकसंख्या असलेल्या छोट्याश्या गावात रात्रीच्या सुमारास कदिर शहा नामक इसमाने फिरोज पठाण वर पिस्तुलातून अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार कदिर शहा हा भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेला असून तो व फिरोज पठाण हे दोघेही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर एकमेकांच्या शेजारी राहतात. दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जागेबाबत वाद सुरु असल्याची माहिती आहे.

दरम्यान दोघांनीही दहीहंडा पोलीस (Police) स्टेशनला एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघेही गावातील गावातील मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यासाठी जात असतानाच आपसांत काहीतरी वाद झाला आणि लगेच कदिरने खिशातून पिस्तुल काढून फिरोज पठाणवर गोळ्या झाडल्या. त्यातच फिरोज खाली कोसळला. (Akola Crime News)

गोळीबाराच्या आवाजाने लगेच गावकरी गोळा झालेत आणि लगेच फिरोजला उपचारासाठी अकोल्याला रवाना करण्यात आले. सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच फिरोजचा मृत्यू झाला. तर गोळीबार करणाऱ्या कदिर शाह याला गावातून अटक केली. सद्यस्थितीत गावात शांतता आहे. पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT