amrishbhai patel 
महाराष्ट्र

माझी ही इच्छा अपुर्ण राहिली : अमरीशभाई पटेल

अमरीशभाई पटेल हे बिनविरोध हाेणार निश्चित झाल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी जमू लागले.

भूषण अहिरे

धुळे Amrishbhai Patel News : काॅंग्रेसचे उमेदवार गाैरव वाणी यांनी आज भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांच्या विराेधातील अर्ज मागे घेतल्याने पुन्हा एकदा धुळे- नंदुरबार विधान परिषद मतदारसंघात पटेल यांचा विजय झाला आहे. या विजया नंतर अमरीशभाई पटेल (Amrish Patel) यांनी शिरपूर (Shirpur) येथील त्यांच्या निवासस्थानी सर्व मतदारांचे आणि भाजप नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले हा विजय सर्व मतदारांच्या एकजूटीमुळे झाला आहे. ते सर्व माझ्या साेबत राहिले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे. खरंतर मला लढायचं हाेतं परंतु आता ती इच्छा अपुर्ण राहिली आहे.

अमरीशभाई म्हणाले दाेन्ही जिल्ह्याचा विकास कसा हाेईल याकडे लक्ष राहील. पालिका, जिल्हा परिषदेत ज्या अडचणी येतात ते साेडविल्या जातील. खास करुन शिरपूरचा विकास कसा हाेईल यासाठी प्रयत्नशिल राहीन. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितीच प्रयत्न राहतील असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

दिल्लीत दाेन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी उमेदावारी मागे घेण्याबाबत निश्चित केले. त्यामुळे विराेधकांनी अर्ज मागे घेतले. काेल्हापूरात काॅंग्रेसचे सतेज पाटील हे बिनविराेध झाले. येथे भाजप पक्ष बिनविराेध झाला आहे असेही पटेल यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT