umesh kolhe death case  saam tv
महाराष्ट्र

umesh kolhe death case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात 'एनआयए'ची मोठी कारवाई; फरार आरोपी अटकेत

अमरावतीमधील (Amravati) उमेश कोल्हे प्रकरणातील महत्वाची माहिती हाती आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

umesh kolhe death case : अमरावतीमधील (Amravati) उमेश कोल्हे प्रकरणातील महत्वाची माहिती हाती आली आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील फरार आरोपी शहिम अहमद याला सत्र न्यायालयातून 'एनआयए' अटक केली आहे. शहिमवर 'एनआयए'ने (NIA) दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शहिमला अटक केल्यानंतर उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

उमेश कोल्हे अमरावतीमध्ये २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान शेखला अटक केली होती. तर शहिम अहमद हा आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता. त्याचा 'एनआयए'कडून तपास सुरू होता. फरार शहिम अहमदबाबत माहिती देण्याऱ्याला 'एनआयए'ने बक्षीस जाहीर केले होते. या फरार आरोपीला 'एनआयए' केले आहे. शहिमला सत्र न्यायालयातून 'एनआयए' अटक केली आहे. शहिमला अटक केल्यानंतर उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शहिमला अटक केल्यानंतर त्याचे वकील अली काशफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अली काशफ म्हणाले, 'उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शहिमने 'एनआयए'कडे आज स्वत:ला आत्मसमर्पन केले. न्यायालयातही त्याला हजर केले होते. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस 'एनआयए'ने ठेवले होते.

'आज सत्र न्यायालयाच्या परिसरातून 'एनआयए'ने त्याला अटक केली. उद्या न्यायालयात हजर केले जाईल. तो आत्मसमर्पन करण्यासाठी आला असता त्याला 'एनआयए'ने त्याला नेले. हे आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून देऊ', असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT