Amaravati Latest News  Saam tv
महाराष्ट्र

Student Drown in Lake : अमरावतीत दोन विद्यार्थी तलावात बुडाले, शोधकार्य सुरू

student drown in lake at amaravati : अमरावीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत दोन विद्यार्थी तलावात बुडाल्याची घटना घडली आहे. अमरावती शहरातील छत्री तलावात ही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अमर घटारे, अमरावती

Amaravati Latest News in Marathi :

अमरावीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत दोन विद्यार्थी तलावात बुडाल्याची घटना घडली आहे. अमरावती शहरातील छत्री तलावात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील दोन विद्यार्थी छत्री तलावाजवळ गेले होते. अमरावती शहरात तलावात गेल्यानंतर या दोन विद्यार्थ्यांचा तोल गेला. दोन्ही विद्यार्थ्यांचा तोल गेल्याने दोघे तलावात बुडाले. . (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावतीमधील छत्री तलावात बुडालेल्या एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आलं आहे. तर एका विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे. तलावात बुडालेला विद्यार्थी हा शासकीय फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी होता. सुयोग दुधाट (वय १९वर्षे) असे तलावात बुडालेल्या विद्यार्थीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

सुयोग हा मित्रासोबत छत्री तलावात पोहायला गेला होता. तलावात पोहोण्यासाठी त्याने एका मित्रासोबत तलावात उडी घेतली. तलावात उडी मारल्यानंतर एक मित्र बाहेर आला. परंतु, सुयोग पाण्याच्या आतमध्ये शेवाळ असल्याने अडकून पडला. सुयोग तलावात अडकल्याने अमरावती महानगरपालिकेच्या रेस्क्यू पथकांना कळविण्यात आलं.

अमरावती महानगरपालिकाचे रेस्क्यू पथकाकडून बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे. रेस्क्यू पथकाकडून विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे, तर कामाकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

Actress Fraud Case: 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; पोलिसांनी जामीन देण्यास केला विरोध

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदान आहे 'हे' फळ; आठवड्यातून एकदा तरी खा, पार्लरशिवाय मिळेल चमकदार त्वचा

TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT