amravati st bus accident  Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीत ST बसला उड्डाणपुलावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस बराच वेळ हवेतच लटकली

अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News : अमरावतीमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. नांदगाव पेठच्या उड्डाणपुलावरून बस खाली कोसळताना थोडक्यात बचावली आहे. त्यामुळे अपघातातून या बसमध्ये प्रवासी करणाऱ्या अनेक प्रवाशांचे जीव थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील विविध महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. अमरावती-नागपूर महामार्गावरील एसटी बसच्या अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. अमरावती-नागपूर महामार्गावरून नांदगाव पेठ येथून एसटी बस नागपूरला जात होती. त्यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावरील कठड्याला एसटी बस (ST Bus) जोराने धडकली.

त्यावेळी एसटी बसमध्ये प्रवाशी बसले होते. बस धडकल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. एसटी बस कठड्याला धडकल्यानंतर उड्डाणपुलावर बराच वेळ हवेतच लटकली. त्यावेळी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचा श्वास अडकला.

नशीब बलवत्तर म्हणून बसमधील प्रवासी नांदगाव पेठच्या उड्डाणपुलावरून बस खाली कोसळताना थोडक्यात बचावले आहेत. मात्र, बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले आहेत. औरंगाबादवरून नागपूरला ही एसटी बस होती. नागपूरमधील गणेश पेठ डेपोच्या या बसला अपघात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT