Harshwardhan Deshmukh , Shivaji Shikshan Sanstha Election Result , Amravati saam tv
महाराष्ट्र

Amravati : शिवाजी शिक्षण संस्थेत हर्षवर्धन देशमुखांचा वरचष्मा; ठाकरेंच्या पॅनलला दणका

शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूकीवेळी एका मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये राडा झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati : स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली व राज्यातील द्वितीय क्रमांकाची संस्था अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या (shivaji shikshan sanstha) पंचवार्षिक निवडणुकीत (election) पुन्हा राष्ट्रवादीचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख (Harshwardhan Deshmukh) यांच्या प्रगती पॅनलने एकतर्फी विजय (victory) मिळविला आहे. या निवडणुकीत माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या विकास पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. (Shivaji Shikshan Sanstha Election Result News)

स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या आणि राज्यातील द्वितीय क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या ९ पदाकरिता रविवारी मतदान झाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत एकूण ७७४ मतदार आहेत. यापैकी ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक पदाच्या जागेवर प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. यात सलग दुसऱ्यादा हर्षवर्धन देशमुख अध्यक्षपदावर विराजमान झाले. प्रगती पॅनलने 9 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. प्रतिस्पर्धी विकास पॅनलने एक जागा जिंकली. दरम्यान काल शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूकीवेळी एका मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये राडा झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT