अमरावतीचे पोलीस शिपाई Saam Tv
महाराष्ट्र

अभिमानास्पद! अमरावतीचे पोलीस शिपाई देणार 'परदेशात' सेवा

'आय.ए.एस, आय.एफ.एस' (IAS-IPS) दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी विदेशात पाठवले जाते.

अरुण जोशी

अमरावती: महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलिस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवल्याची घटना ही तशी कमीच. पण अमरावती ग्रामीण पोलीस (Amravati Gramin Police) दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर (Vikas Anjikar) यांना नुकतच सेवा देण्यासाठी परदेशात पाठविण्यात आलं आहे.

'आय.ए.एस, आय.एफ.एस' (IAS-IPS) दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी विदेशात पाठवले जाते. मात्र आता अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई विकास अंजिकर यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी दिली आहे. अधिकार्‍यांप्रमाणेच पोलीस दलातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना परदेशात सेवा देण्यासाठी पाठविण्यात येते. याच योजनेअंतर्गत विकास अंजीकर यांची तीन वर्षासाठी 'फॉरेन डेप्युटेशन' वर पाठविण्यात आले आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती देताना अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी सांगितले पोलीस दलातील शिपायांना विदेशात सेवेची संधी मिळावी याकरिता ही योजना आहे. आतापर्यंत केलेल्या पोलीस सेवेतील शेरे, सेवा व कार्याची माहिती घेऊन शिपायांची या सेवेकरिता नियुक्ती करण्यात येत असते. याकरिता दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रातून कर्मचाऱ्याला ट्रेनिंग देण्यात येते व मुलाखत घेऊन अंतिम सिलेक्शन होते. ही नियुक्ती तीन वर्षाकरिता असते.

अमरावती ग्रामीण पोलीस दलाची शिपाई पुढील तीन वर्ष विदेशात जाऊन 'सिक्युरिटी असिस्टंट' म्हणून सेवा देणार आहेत.विदेशात सेवा देण्यासाठी निवड झालेली पोलीस शिपाई विकास अंजिकर सांगतात. विदेशात जाऊन भारत मातेसाठी प्रामाणिकपणे सेवा करण्याची मिळालेली संधी आहे त्यांना मिळालेल्या या संधी मुळे ग्रामीण पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT