अमरावतीच्या परतवाडामधील लव्ह जिहाद प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लैंगिक शोषणामागील आरोपींची विकृत मानसिकता पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय...फक्त एका पैजेपोटी अनेक मुलींचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या नराधम अयान अहमदचं त्याच्याच मित्रानं कसं बिंग फोडलंय ते पाहूया.
मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी नराधम आरोपी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यात पैज लागली होती...
कोण जास्त मुलींना पटवणार आणि त्यांना मोहात पाडणार? अशी पैज लागली होती...अयान अहमदनं पीडितांचे अश्लील कृत्यांचे व्हिडिओ बनवून पुरावा म्हणून उझेर खानला पाठवायचा.. दोन्ही आरोपी मित्रांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून भांडण झालं... आणि रागाच्या भरात उझेर खाननं अयानचे सर्व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले...त्यात अयानचा आणखी एक मित्र मोहम्मद साबीर हा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ शेअर करायचा...तरबेज खानही हेच व्हिडिओ इन्सट्रग्राम आणि स्नॅपचॅटवर पाठवायचा....आतापर्यंत आरोपींनी एकूण 18 व्हिडिओ आणि 39 फोटो विविध माध्यमांवर व्हायरल केले आहेत. त्यात आरोपी अयान अहमदला पीडितांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी मानव सुगंधे हा रुम उपलब्ध करून द्यायचा...
दरम्यान अमरावतीतील कठोरा नाका परिसरात ज्य़ा फ्लॅटमध्ये आरोपी अयान तरुणींवर अत्याचार करत होता...तो फ्लॅट पोलिसांनी सिल केलाय. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 8 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलयं...त्यामुळे या प्रकरणात मोठं रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता आहे... अशातच आरोपी अयान अहमदच्या 5 मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला तर आणखी किती तरुणी या विकृतीच्या शिकार झालेत हे समोर येईल... मात्र त्याआधी 45 सदस्यांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी SIT ची स्थापना करण्यात आलीय...मात्र समाजातील अशा विकृतांना वेळीच आवरणं गरजेचं आहे, हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.