Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : गद्दारांना श्रद्धांजलीचे लागले फलक; अमरावती शहरात चर्चेचा विषय

गद्दारांना श्रद्धांजलीचे लागले फलक; अमरावती शहरात चर्चेचा विषय

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती ः राज्‍यात झालेल्‍या वर्षभरातील घडामोडीत शिवसेनेच्‍या आमदारांनी बंड केले होते. यानंतर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या आमदारांनी बंड करत (BJP) भाजप व शिवसेना सरकारसोबत गेले आहेत. या विरोधात अमरावती (Amravati) शहरात गद्दारांना श्रद्धांजली असे फलक लावले आहेत. हे फलक लागल्‍याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. (Breaking Marathi News)

राज्याच्या राजकारणात शिंदे गटाने बंड केले होते. वर्षभरानंतर आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अजित पवार यांनी मोठे बंड केले. गतवर्षी शिंदे गटाने बंड करत भाजपसोबत सत्‍ता स्‍थापन केली. तर आता राष्‍ट्रवादीचे अजित पवार यांच्‍यासह आमदारांनी बंड करत राज्‍य सरकारसोबत गेले आहेत. यामुळे राज्‍यातील राजकारणात उलथापालथ पहावयास मिळत आहे.

अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे फलक आहेत. या फलकावर राजकारणातील चालू घडामोडी विषयी भाष्य केले आहे. या फलकावर सध्या सर्व गद्दारांना श्रद्धांजली, शोकाकुल समस्त मतदार अशा आशयाचे फलक लागलेले आहे आणि हे फलक सध्या अमरावती शहरात चर्चेचा विषय ठरलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरपावसात आदिवासी महिलांचा अवैध दारू विरुद्ध एल्गार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखायचा, लक्षणे कोणती?

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

SCROLL FOR NEXT