Temperature Saam tv
महाराष्ट्र

Climate Change : फेब्रुवारीमध्येच उन्हाळ्याची चाहूल; वातावरणातील बदलाने वाढलेत आजार

बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

Amravati Climate Change : अमरावतीत दिवसा उन्हाची तीव्रता आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी थंडी अशा काहीशा वातावरणामुळे नागरिक संभ्रमात पडले आहे. वातावरणातील उकाडा वाढत असल्याने आता उन्हाळ्याची चाहूल दिसू लागली आहे.

कधी थंडी तर कधी काही तासातच उकडा असा वातावरणाचा अनुभव असतानाच हा हिवाळा की उन्हाळा असा प्रश्न नागरिकांना पडू लागलाय. या वातावरणाचा बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही (Farmer) बसला आहे. सद्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन महिन्यांपासून थंडीचा कडाका वाढला असताना काही दिवसांपासून वातावरणात बदल झालेला दिसून येतोय. रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना स्वेटर मफलर कान टोप्या वापरावे लागतात सकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना सुद्धा स्वेटर चा वापर करावा लागतोय. सकाळी दहा नंतर उन्हाची चाहूल लागते.

दिवसभर उन्हाचा कडाका वाढत असल्याने टोप्या तसेच दुपट्ट्यांचा वापरही वाढला आहे. ग्रामीण भागात तर आतापासूनच पाणीटंचाईचा झळा लागण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT