Dengue Patients Saam tv
महाराष्ट्र

Dengue Patients : पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण; पाच दिवसात सहा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग सतर्क

Amravati News : पावसाळा सुरु झाला असतानाच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून पाच दिवसात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: पावसाळा सुरु झाल्यानंतर वातावरणातील बदलामुळे आजाराचे प्रमाण वाढत असते. तर साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूचे रुग्ण सापडत असतात. दरम्यान पावसाळा सुरु झाला असतानाच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून पाच दिवसात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 

पावसाळा सुरू होताच (Amravati) अमरावती जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात मागील पाच दिवसात सहा डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये २१ जूनला २ तर 25 जून रोजी चार डेंग्यूचे (Dengue) रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागात दिली आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून आता परिसरात सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली आहे. 

आरोग्य विभाग सतर्क 

डेंग्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावे; असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच वारंवार ताप येणे, थंडी भरून येणे, डोके दुखणे, हाडांचे दुखणे, उलट्या होणे इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; असे आवाहन जिल्हा शिल्लक चिकित्सक दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT