Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati : वीजपुरवठा खंडितचा त्रास; वलगाव उपकेंद्रात तरुणांनी पेट्रोल टाकून जाळले टेबल- खुर्ची, सहाय्यक अभियंत्यालाही जाळण्याचा प्रयत्न

Amravati News : वारा किंवा पाऊस आल्यानंतर लागलीच वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज खंडित राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरु झाल्याने मागील काही दिवसांपासुन हा त्रास अधिक वाढला

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या जाणवत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या दोन तरुणांनी उपकेंद्राच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून टेबल- खुर्ची जाळून टाकली आहे. तसेच सहाय्यक अभियंत्याला देखील जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

थोडा वारा किंवा पाऊस आल्यानंतर लागलीच वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. तासंतास वीज खंडित राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरु झाल्याने मागील काही दिवसांपासुन हा त्रास अधिक वाढला आहे. संतप्त नागरिक जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन समस्या मांडतात मात्र याचा काही उपयोग होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. वारंवार होणाऱ्या त्रासाने संतप्त झालेल्या तरुणांनी थेट वलगाव उपकेंद्रात धडक दिली. 

टेबल- खुर्ची जाळली 

अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रात घुसून दोघांनी तेथील टेबल खुर्चीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे. आमच्या भागात वीज व्यवस्थित राहत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय करता नियमित वीज पुरवठा का होत नाही? असा सवाल दोघांनी उपस्थित करत थेट कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. 

दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान महावितरणच्या उपकेंद्रात जाऊन नुकसान केल्या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सध्या दोघे आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT