Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu Statement : राष्ट्रवादीसोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची गोची; बच्चू कडू यांनी बोलून दाखवली खदखद

राष्ट्रवादीसोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची गोची; बच्चू कडू यांनी बोलून दाखवली खदखद

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेतांना त्यांचे मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं. तर विचारात व विश्वासात न घेता (NCP) राष्ट्रवादीला सोबत घेतले; असा दावा शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला. (Maharashtra News)

राज्‍यातील झालेल्‍या घडामोडीत राष्‍ट्रवादीचे अजित पवार यांच्‍यासह काही आमदारांनी बंड करत भाजप व शिवसेनेला पाठींबा दिला. यानंतर अजित पवार यांना उपमुख्‍यमंत्री पद तर अन्‍य आठ आमदारांना मंत्रीमंडळात स्‍थान दिले आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांची गोची झाली आहे. याबाबत आमदार बच्चू कडू यांनी आपली खदखद बोलून दाखवली.

राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदेसोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे. कारण माविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हती. शिवसेनेचे (Shivsena) मतदार संघ फोडून त्यांच्या मतदार संघाची बांधणी होत होती असा आरोप होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचे आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काहीपण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे; अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल प्रकरणात नवीन अपडेट, केतनला सिया आणि चेतनचा होता संशय

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT