MP Navneet Rana MLA Ravi Rana Amravti News Saamtv
महाराष्ट्र

Amravati News: अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दांपत्याची अनवाणी पदयात्रा; शरद पवारांनी भाजपसोबत येण्यासाठी घातलं साकडं

Navneet Rana Ravi Rana News: विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दांपत्याने पदयात्रा सुरू केली आहे

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी

Amravati News:

अमरावतीचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे अमरावतीत आज पदयात्रा काढणार आहेत. विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दांपत्याने पदयात्रा सुरू केली आहे. गंगा -सावित्री निवासस्थानापासून 4 किलोमीटर अंबादेवीमंदिरापर्यंत पदयात्रा काढणार असून राणा दांम्पत्य महाआरतीही करणार आहे.

पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी साकडं घालणार...

अमरावतीमध्ये (Amravati) राणा दांपत्याची अनवानी पायाने पदयात्रेला सुरूवात झाली आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. 4 किलोमीटर अंबादेवी मंदिरापर्यंत पदयात्रा काढल्यानंतर राणा दांम्पत्य महाआरतीही करणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी साकडं घालणार असल्याची प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

"2024 मध्ये पुन्हा देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे सरकार यावे. पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनावेत व शरद पवार यांनी देशाच्या विकासासाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत आले पाहिजे त्यासाठी मी अंबादेवीला साकड घालणार असल्याल्याचे राणा दांपत्यांनी सांगितले.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीनंतर शरद पवारही पंतप्रधान मोदींसोबत?

दरम्यान, यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी दिवाळीनंतर शरद पवारही (Sharad Pawar) पंतप्रधान मोदींसोबत असतील, असा मोठा दावा केला आहे. "सध्या तळ्यात मळ्यात असणारे शरद पवार हे दिवाळीनंतर मोदीजींसोबत जातील. सोबतच अनेक राजकीय पक्ष दिवाळीनंतर हे भाजपसोबत (BJP) जातील असा गौप्यस्फोट आ. रवी राणा यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

Mumbai Local : मुंबईकरांना मोठी भेट! नव्याकोऱ्या 268 एसी लोकल ट्रेन येणार, प्रवास गारेगार होणार!

SCROLL FOR NEXT