Mahapareshan Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : महापारेषणची पद भरती प्रक्रिया रद्द; विद्यार्थ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

Amravati News : जाहिरातीनुसार आयटीआय व इंजिनीअर झालेल्या विद्यार्थ्यांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत इनलाईन अर्ज सादर केले होते. या पदांची परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होत

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी २०२३ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. हि भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना महापारेषणने भरती रद्द केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. 

महापारेषणकडून रिक्त असलेल्या जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार आयटीआय व इंजिनीअर झालेल्या विद्यार्थ्यांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत इनलाईन अर्ज सादर केले होते. या पदांची परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होत. त्यामुळे अनेक विद्यार्थी खाजगी नोकऱ्या सोडून विद्यार्थी (Student) परीक्षेच्या तयारीला लागले होते. मात्र अचानक महापारेषणच्या सर्व पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 

महापारेषणने अचानक भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आज (Amravati) अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांना निवेदन दिले. यावेळी तातडीने हीच भरती राबविण्यात यावी अशी मागणी विद्यार्थीनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Abhijeet Dipke : सीजेपी पुन्हा सरकारविरोधात मोठं आंदोलन करणार; अभिजित दीपिकेंचा इशारा

मेथीच्या भाजीपासून बनवा कुरकुरीत भजी, चविष्ट आहे रेसिपी

Mukkam Post Pandharpur: श्रद्धा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार; 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

SCROLL FOR NEXT