Amravati's Khanampur Pandhari Controversy Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: कमानीचा वाद, दगडफेक आणि लाठीचार्ज; अमरावतीत काय घडलं?

Pandhari Khanampur Dispute: अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमनेसामने आले.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Khanampur Pandhari Controversy:

अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमनेसामने आले.

याच मुद्द्यावर आज मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगण्यात येते. गेल्या पाच दिवसांपासून खानापूर गावच्या प्रवेशद्वाराचा वाद सुरू आहे. यावरून स्थानिकांनी आंदोलनही केले होते. यानंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. मात्र संचारबंदी झुगारून मोठ्या संख्येने आंदोलक अमरावतीत पोहोचले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालाय माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी याच मुद्यावर येथील पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. त्यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढला होता. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. (Latest Marathi News)

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यराखीव पोलीस दलाच्या तुकड्या याठिकाणी तैनाद करण्यात आल्या होत्या. तसेच आज याच मुद्द्यावर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना हे आंदोलन अधिक तापलं. यानंतर विभागिय आयुक्त कार्यालयाबाहेर पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यातर आता परिस्थितीत नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून खरबदारी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SSC Success Story: दररोज 2 किमीची पायपीट,कंदिलाच्या उजेडात अभ्यास; दहावीत 94.20% गुण मिळवणाऱ्या वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी कहाणी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलेले समुद्री सौंदर्य, 'या' बीचवर एन्जॉय करा वीकेंड, कडक उन्हात अनुभवाल थंडगार हवा

SCROLL FOR NEXT