Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : सोयाबीन भाववाढीसाठी चक्काजाम आंदोलन

Amravati News: सोयाबीन भाववाढीसाठी चक्काजाम आंदोलन

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : नवीन सोयाबीन काढणीला सुरवात झाली आहे. परंतु मार्केटमध्ये शेतकऱ्याला सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे सोयाबीनच्या (Soyabean) भाव वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Amravati) अमरावती जिल्ह्यतील धामणगाव रेल्वे येथे चक्काजाम आंदोलन केले. (Tajya Batmya)

यावर्षी सोयाबीन पिकावर विविध रोगांच्या प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात सध्या बाजारात सोयाबीनला ४ हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे. हा भाव मिळत असल्याने उत्पदनासाठी लावलेला खर्च देखील निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल ८ हजार रुपये भाव मिळावा, अमरावती जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना पिक विमा लागू करावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 

वाहतूक रोखली 

सोयाबीनच्या भाववाढीसाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या दरम्यान काही वेळासाठी धामणगाव ते मंगरूळ दस्तगीर रस्ता अडवत चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक अडकली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gingee Fort : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

Samantha Ruth Prabhu : ३९व्या वर्षी सामंथा रुथ प्रभु आई होणार? 'त्या' व्हायरल VIDEO ने सुरू झाली चर्चा

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT