Amravati Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Amravati vidhan Sabha : अमरावती मतदारसंघावर भाजपचा दावा; माजी मंत्री रिंगणात उतरण्याच्या तयारीत

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदार संघात भाजपने दावा ठोकला आहे. या ठिकाणी भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप अजूनही झालेली नाही. यामुळे अनेक ठिकाणच्या मतदार संघांवर दवे- प्रतिदावे केले जात आहेत. अशातच अमरावती विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा ठोकला असून येथील माजी मंत्री जगदीश गुप्ता हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.  

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदार संघात भाजपने दावा ठोकला आहे. या ठिकाणी भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळणार व मी भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरणार; असा दावा जगदीश गुप्ता यांनी केला. या मतदारसंघात काँग्रेसच्या निलंबित विद्यमान आमदार सुलभा खोडके आहे. त्या आता राष्ट्रवादीकडून महायुतीच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र या जागेवर (BJP) भाजपने दावा केल्याने या ठिकाणी पेच निर्माण झाला आहे. 

गुप्ता भाजपचे जेष्ठ नेते 

जगदीश गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अमरावतीचे पालकमंत्री पद सुद्धा भूषवले आहे. अमरावती विधानसभा आणि विधान परिषद या राज्याच्या दोन्ही सभागृहात त्यांनी २२ वर्ष अमरावतीचे नेतृत्व केले. अमरावती महापालिकेत १५ नगरसेवक असताना त्यांनी सलग चार वेळा अपक्षांच्या मदतीने महापालिकेत सत्ता काबीज केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Accident : समृध्दीवर भयंकर अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू, ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

India Tourism : लाल दगड अन् संगमरवरी कला, 'हा' वास्तुकलेचा अद्भुत नजारा पाहून तुमचे डोळे दिपतील

Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी काय करायचं?

Kelyacha Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा मऊसूद आणि चविष्ट केळ्याचा शिरा

SCROLL FOR NEXT