water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

water Scarcity : आठ- आठ दिवस पाणी मिळेना; अमरावती, बडनेरात कृत्रिम पाणीटंचाई

Amravati News : अमरावती शहरात दिवसाआड तर बडनेरा शहरात तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर आठ- आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा वाढत असल्याने पाण्याचे स्रोत आटत आहेत. यामुळे पाण्याची टंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे अमरावती शहर व बडनेरा शहरात कृत्रिम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पाण्याचे नियोजन होत नसल्याने लोकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. आता आमदार राणा यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्या सोबत बैठक झाली. 

अमरावती शहरात दिवसाआड तर बडनेरा शहरात तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर आठ- आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे आज आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यासमवेत नागरिकांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतला. 

तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा 

दरम्यान मुबलक पाणी असून सुद्धा पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केलं जात नाही. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करा. तर जे पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी पाणी योग्य प्रकारे सोडत नसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जे लोक पाणी चोरी करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा सूचना रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

आमदार राणांचा थेट इशारा 

अमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे पाणी सोडण्याच नियोजन व्यवस्थित करा. मात्र याचं नियोजन योग्य प्रकारे करत नाही. अधिकारी पाणी सोडण्याच्या नियोजनाकडे व्यवस्थित बघत नाही. पाणी सोडण्याचा आणि बंद करण्याचा टाईम टेबल नाही. त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांनी पाणी समस्याबाबत दिरंगाई केली, तर कुणाला सोडणार नाही असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT