Bacchu Kadu News  Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu : बच्चू कडूंना 'ते' वक्तव्य भोवणार? महिला मुक्ती मोर्चा आक्रमक, गुन्हाही दाखल

तक्रारीनंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यावर कलम 501 नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bacchu Kadu vs Ravi Rana : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu)  प्रचंड आक्रमक झाले आहेत. अशातच बच्चू कडू यांनी तृतीय पंथीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केलंय, असा आरोप अमरावतीतील महिला मुक्ती मोर्चाने केला आहे.

बच्चू कडू यांच्याविरोधा महिला मुक्ती मोर्चाने तक्रारही दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यावर कलम 501 नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. रवी राणा  (Ravi Rana) यांच्याविरोधात टीका करताना आमदार बच्चू कडू यांनी महिलांच्या तसेच तृतीय पंथीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केलं, असं तक्रारीत म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात आरोपांची मालिका सुरू आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला. या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत.

एका बापाची औलाद असाल, तर आम्ही पैसे घेतल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. पुरावे दिले तर त्यांच्या घरची भांडी घासू असंही बच्चू कडू म्हणाले होते. या वक्तव्याविरोधात महिला मुक्ती मोर्चा आक्रमक झाली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात अमरावतीत राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. रवी राणा यांनी अशा प्रकारे इतरांमार्फत तक्रार दाखल करून घाणेरडं राजकारण करू नये असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : बायकोच्या या 5 गोष्टी डोळे झाकून मान्य करणं ठरेल धोकादायक, चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

RCB vs GT IPL 2026 Final: सात षटकानंतर गुजरातच्या संघाचं अर्धशतक पूर्ण

विधानपरिषद निवडणुकीत मोठं काहीतरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या बैठकीत ट्विस्ट, नेत्यांना दिल्या महत्वाचा सूचना|VIDEO

Panvel Tourism : अवघ्या १० मिनिटांचा ट्रेक अन् दिसेल शहराचा सुरेख नजारा, पनवेलजवळील 'हे' ऑफबीट ठिकाण नक्की पाहा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT