Amravati Bike Accident Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Accident: कॉलेजवरून घरी जाताना काळाचा घाला, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा ते देऊरवाडा वळणावर ही घटना घडली.

अतिवेगामध्ये आलेल्या टूव्हीलर एकमेकावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले होते. यामधील दोघांचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर इतर २ जखमींना उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात हलवले. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. या अपघाताचा तपास अमरावती पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे घटनास्थळावर वाहतूक कोंडी झाली होती.

कुणाल नरेश भुते (वय 18 वर्ष रा. देऊरवाडा) आणि शेख मुस्ताक शेख गैसूद्दीन (वय 32 वर्षे रा. देऊरवाडा) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. तर विनोद रामकृष्ण फिसके (वय 35 वर्षे रा. देऊरवाडा) आणि सारंग नामदेव संभे (वय 18 वर्षे रा. शिरजगाव कसबा) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेला कुणाल नरेश भुते आणि गंभीर जखमी सारंग नामदेव संभे हे श्रीमती लक्ष्मीबाई भेले कनिष्ठ महाविद्यालय शिरसगाव कसबा येथे शिकत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT