Crime News Saam TV
महाराष्ट्र

Amravati: धक्कादायक! अल्पवयीन कुमारी बनली माता, गुन्हा दाखल; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

या अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर गटारे, अमरावती

Amravati News: सोळा वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार होऊन गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना अमरावतीमधील पीडीएमसी रुग्णालयात घडली आहे. या अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. नगर भागात ही मुलगी शिक्षणासाठी भाड्याने राहत होती. (Amravati)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका सोळा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीला बलात्कार गर्भधारणा होऊन तिने मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना अमरावती येथील पीडीएमसी रुग्णालयात उघड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गाडगे नगर भागात तीन मुली शिक्षणासाठी भाड्याने राहत होत्या.

त्यापैकी एका सोळा वर्षीय मुलीचे सोमवारी अचानक पोट दुखू लागल्याने तिला रात्री उशिरा पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले.यासंबंधित गाडगे नगर पोलीस व बालकल्याण समितीला माहित देण्यात आली व तिच्या वयाची खात्री देखील करण्यात आली.

दरम्यान मंगळवारी तिला वेदना होऊन तिने स्त्री अर्बकाला जन्म दिला.त्यानंतर ही माहिती तिच्या घरी देण्यात आली.त्या अल्पवयीन मुलीने आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला व पुढे तिची चौकशी केली असता तो आरोपी 23 वर्षाचा व मुलगी ही 16 वर्षाची असल्याची माहिती समोर आली आहे.आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर काल रात्री उशिरापर्यंत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband- Wife Relationship Tips: नात्यात 'या' 5 गोष्टींचा हिशोब ठेवताय? पार्टनरसोबत कायमचा दुरावा येण्याआधीच थांबवा हे काम

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीत उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण; ग्रामस्थांची जोरदार तयारी

Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT