Amravati Dengue Saam tv
महाराष्ट्र

Amravati Dengue Update : अमरावतीत डेंग्यूचा विळखा वाढला; जिल्ह्यात महिनाभरात आढळले १०० रुग्ण

Amravati News : पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा फैलाव झपाट्याने वाढत असतो. सध्या सर्वत्र व्हायरल इन्फेक्शनने अनेकजण तापाने फणफणले आहेत

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा वाढला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात गेल्या महिनाभरात हे प्रमाण अधिक वाढले असून जिल्ह्यात मागील ३६ दिवसात १०० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. 

पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा फैलाव झपाट्याने वाढत असतो. सध्या सर्वत्र व्हायरल इन्फेक्शनने अनेकजण तापाने फणफणले आहेत. याशिवाय डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यासारख्या आजाराची साथ देखील पसरली आहे. दरम्यान अमरावतीमध्ये डेंग्यूचा (Dengue) डंख अनेकांना बसला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असून रुग्णालयांमध्ये देखील गर्दी वाढत आहे. यामुळे नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित साफ करावी, एक दिवस कोरडा पाळणे आवश्यक असून रुग्णांना लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावा; असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अमरावती शहरात १२६ रुग्ण 

अमरावती (Amravati) जिल्ह्यासह शहरातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात मागील ८ महिन्यात तब्बल १२६ तर मागील ३६ दिवसात १०० डेंगूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर उर्वरित जिल्हाभरामध्ये आठ महिन्यात १३५ रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात १ जानेवारी ते ५ सप्टेंबर या काळात जिल्ह्यात एकूण २६१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

SCROLL FOR NEXT