पाहिलंत... हा काही रहिवासी इमारतीवरील मटण पार्टीचा व्हिडीओ नाहीये... तर
ही पार्टी रंगली ती... अमरावतीमधील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर...
होय... या मटण पार्टीचा ड्रोन कॅमेऱ्यातील व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच
खळबळ उडाली. अशातच आता अमरावती जिल्हा प्रशासनानं या पार्टीची गंभीर दखल घेतलीये.
जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाच्या
कारवाईचा इशारा दिलाय...
दरम्यान या वरुन स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. मोर्शीच्या नगराध्यक्षा
प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने यांनी या पार्टी प्रकरणावरुन सावरासारव केली असली, तरी
महायुतीमधील मित्रपक्ष भाजप मात्र मुख्याधिकाऱ्यांविरोधात आक्रमक झालाय...
मराठवाडा, विदर्भात तीव्र दुष्काळ असताना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांंनी
झाेडलेल्या मटण पार्टीचे राजकीय पडसाद उमटलेत. शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी
अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय. विरोधकांनीही प्रशासनावर हल्लाबोल केलाय.
एकीकडे संपूर्ण अमरावती जिल्हा भीषण दुष्काळाच्या सावटाखाली असताना आणि
हक्काच्या पाण्यासाठी जनता संकटाशी सामना करत असताना, दुसरीकडे मात्र सरकारी
बाबूंची मजा सुरू असल्याचं दिसतंय... याआधी नांदेडमधील दुष्काळाच्या आढावा बैठकीत
कृषी अधिकारी
काजू-बदामावर ताव मारताना दिसले होते. मात्र, आता मोर्शी नगरपरिषदेतील
अधिकाऱ्यांनी चक्क मटण पार्टी झोडलीये. जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीशीला मुख्याधिकारी
काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत
सरकारी अधिकाऱ्यांची संवेदनशीलता आणि जबाबदारी पणाला लागलीये एव्हंढ मात्र
निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.