Love Jihad Saam Tv
महाराष्ट्र

Amravati: कथित लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी स्वगृही परतली; पोलिसांनी जबाब नोंदवत केलं आई-वडिलांच्या स्वाधीन

Amravati Love Jihad Case: या प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी लव्ह जिहादचा आरोप केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, साम टिव्ही

अमरावती: अमरावती (amravati) जिल्ह्यातील कथित लव्ह जिहादचा आरोप झालेले प्रकरणातील बेपत्ता तरुणी अखेर चार दिवसांनंतर अमरावतीत पोहोचली आहे. पहाटे चार वाजता तरुणीला अमरावती पोलिस (police) साताऱ्यावरून अमरावतीला घेऊन आले. पहाटे चार वाजता अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणींचा जबाब नोंदवला गेला. रागाच्या भरात स्वतःहून घरातून निघाल्याचा जबाब या तरुणीने सातारा पोलिसात नोंदवला होता. जबाब नोंदवल्यानंतर पहाटे तरुणीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. या प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी लव्ह जिहादचा आरोप केला होता. मात्र, तरुणीचा जबाब नोंदवल्यांनंतर नवनीत राणा आणि शिवराय कुलकर्णी यांचा दावा फोल ठरल्याचं दिसत आहे. (Amravati Love Jihad Case)

दरम्यान अमरावतीतून (amravati) बेपत्ता असलेली हिंदू तरुणी ही स्वत:च घरातून निघून गेली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलीस (police) आयुक्त आरती सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. "मला राग आल्याच्या कारणावरून मी घर सोडलं" असा जबाब या तरुणीने सातारा पोलिसांना दिला होता. त्यानंतर तरुणीला सातारा पोलिसांनी अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले. अमरावती पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवत तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.

अमरावती लव्ह जिहाद काय आहे प्रकरण?

अमरावतीत एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलं तापलं होतं. हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. प्रकरण समोर येताच खासदार नवनीत राणा, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडें यांच्यासह हिंदू संघटनांनी लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला होता.

इतकंच नाही तर, खासदार नवनीत राणा यांनी या बेपत्ता मुलीवरून पोलीस ठाण्यात २० मिनिटं जोरदार राडा केला होता. जर बेपत्ता झालेली तरुणी सापडली नाही तर, आंदोलन करू असा इशारा देखील राणा यांनी पोलिसांना दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका सोहेल शहा नामक तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पोलिस त्याची कसून चौकशी करीत होते. (Amravati Love Jihad News Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT