Amravati government hospital NICU fire 3 newborn babies death saam tv
महाराष्ट्र

रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू, नवजात निष्पापांचे मारेकरी कोण?

Amravati NICU Horror: अमरावतीमधील मुर्दाड यंत्रणेमुळे 3 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. व्हेन्टिलेटरच्या भीषण स्फोटामुळे अनेक निष्पाप बालकांचाही जीव धोक्यात आला. आग आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे निष्पाप बालकांचे मारेकरी कोण आहेत?... पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...

Rohit Kadam

हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आहे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या निष्पाप बालकाच्या वडलांचा....नुकत्याच जन्मलेल्या पोटच्या गोळ्याचा चेहरा पाहण्यापूर्वीच तो गेल्यानं पालकांनी अक्षरशः हंबरडा फोडलाय. अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे साडेचारच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर तब्बल 36 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढून वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, पोटच्या गोळ्याला गमावल्यानं अनेक कुटुंबांना मानसिक धक्का बसलाय. अशाच एका बापाचा हृदय पिळवटून टाकणारा हा आक्रोश पाहा...

रुग्णालयात आग लागली.. त्यावेळी बालकांचे नातेवाईक वॉर्डच्या बाहेर झोपले होते. आग लागल्याचं समजताच त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक बालकांचे जीव वाचवले. मात्र, जर आणखी 15 ते 20 मिनिटं उशिर झाला असता तर आणखी किती बालकांचा बळी गेला या विचार करतानाही हृदयाचा थरकाप उडतो.

तर दुसरीकडे, रुग्णालयातील नर्स देवदूत बनून मदतीसाठी धावून आल्यात. रुग्णालयातील घटनेचा धक्कादायक अनुभव त्यांनी सांगितलाय. अमरावती जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेत कोणत्या मातांनी बाळ गमावलंय.. तेही पाहूयात

या मातांनी बाळ गमावलं

पूजा बरगे पुलगाव

मुलगा गमावला

नाचनगाव रोड, पुलगाव

किरण बेठेकर

मुलगी गमावली

बोरला, चिखलदरा

गायत्री चोपडे

मुलगा गमावला

खेड, अंजनगाव सुर्जी

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2022 मध्ये अमरावती जिल्हा रुग्णालयातच व्हेंटीलेटरचा स्फोट झाला होता. ज्या नागपूरच्या शिल्लर कंपनीचे व्हेंटिलेटर होते तेच व्हेंटिलेटर पुन्हा या रुग्णालयात का बसवली असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. तर आपातकालीन अग्निशमन यंत्रणाही निकामी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

याच रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत सात वर्षांपूर्वी आगीची घटना घडली होती. त्यावेळी नर्सच्या प्रसंगावधानामुळे अनेक बालकांचे जीव वाचले होते. मात्र तरीही इथली निगरगठ्ठ यंत्रणा सुधारली नाही. मुळात ज्या नागपूरच्या कंपनीच्या व्हेंटिलेटरचा आधी स्फोट झाला होता. त्याच कंपनीचा व्हेंटीलेटर कुणाच्या हितासाठी वापरण्यात आला? रुग्णालयातली अग्निशमन यंत्रणा का कार्यान्वित नव्हती? नवीन इमारत होती तर तिचं फाय़र ऑडिट झालेलं नव्हतं का? असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत. मात्र य़ा तीन नवजात शिशूंच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर कठोर करावाईची गरज आहे. अन्यथा सरकारी रुग्णालयं म्हणजे असेच मृत्यूचे सापळे ठरत राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT