Amravati Graduate Constituency Saam tv
महाराष्ट्र

Amravati Graduate Constituency : मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करणाऱ्या मंडळ अधिकारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News : अमरावतीतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करणाऱ्या मंडळ अधिकारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या नेमानी गोडाऊन येथे ही घटना घडली आहे.

मंडळ अधिकारीस हृदयविकाराच्या झटकाचा आल्यानंतर अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर सर्वच कर्मचारी मदतीला धावले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर एकच शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडळ अधिकारी शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सकाळपासून मतमोजणी केंद्रावर सेवा देत होते. मध्यरात्री अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) दाखल केले. उपचारादरम्यान शाहूराव खडसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

अमरावती (Amravati) पदवीधर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडळ अधिकारी शाहूराव खडसे हे सेवा देत होते. शाहूराव हे सकाळपासून मतमोजणी केंद्रावर सेवा देत होते.

मात्र, मध्यरात्री अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर शाहूराव खडसे यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शाहूराव यांच्या मृत्यूची वार्ता मतमोजणी केंद्रातील कर्मचाऱ्यांना कळताच सर्वत्र एकच शोककळा परसरली. शाहूराव खडसे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lack of sleep health risks: फक्त थकवा नाही! वाचा अपुरी झोप तुमच्या मेंदूची ताकद कशी कमी करते

Bridal Makeup Tips: लग्नासाठी परफेक्ट ब्राइडल मेकअप हवा आहे? मग या साध्या मेकअप टिप्स नक्की करा फॉलो

Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

IAS तुकाराम मुंढे यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे निधन

राघव चड्ढांची आपनेच केली बोलती बंद! राज्यसभेतलं पदही काढून घेतलं; दिल्लीच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT