Bacchu Kadu Saam Tv
महाराष्ट्र

'महाविकास'च्या राज्यमंत्र्यास आत्मविश्वास; 'आम्हीच जिंकणार'

अरुण जोशी

बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान हाेत असले तरी चार जागांवर चार संचालकांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.

अमरावती : आम्ही दहा वर्षाचा कारभार मतदारांसमाेर मांडला. मतदार हे मतदानातून चीड व्यक्त करतील असा मला विश्वास आहे. आमचे पॅनेल बहुमताने निवडून येईल असा विश्वास परिवर्तन पॅनेलचे प्रमुख संघटक राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. त्यांनी अमरावती बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. amravati-district-cooperative-bank-election-yashomati-thakur-bacchu-kadu-today-voting-sml80

आज (साेमवार) अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे विशेषतः राजकारणातील दिग्गजांचे लक्ष लागले आहे. ही निवडणुक महाविकास आघाडीमधील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात हाेत आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले परिवर्तन पॅनल या निवडणुकीत विजयी होईल. आम्ही मतदारांसमाेर दहा वर्षाचा कारभार मांडला. शेतक-यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मतदार मतदानातून दाखवून देतील असा विश्नास मंत्री कडू यांनी व्यक्त केला.

दरम्यान जिल्हा बँक निवडणूक काँग्रेसची सलग दहा वर्ष सत्ता होती. ही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके, राज्यमंत्री बच्चू कडुसह इतर नेते एकत्र आले आहेत. यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT