Amravati Crime News Saam TV
महाराष्ट्र

Amravati Crime News: ब्रेकअपनंतर शेवटच्या भेटीने केला घात; दोघेही सापडले रक्ताच्या थारोळ्यात

Crime News: गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News: अमरावती येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन प्रेमी युगूलांमधील भांडणामुळे प्रेयसीचा जीव गेला आहे. गावात मोकळ्या रानात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रेयसीचा यात जीव गेला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तरुण आणि तरुणी एकमेकांवर प्रेम करत होते. ते दोघेही अमरावतीच्या (Amravati) राम मेघे कॉलेजचे विद्यार्थी असून ITI ला शिकत होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्यात मैत्री झाली. पुढे ही मैत्री प्रेमात बदलली.

शेवटच्या भेटीने घेतला जीव

काही दिवसांनी दोघांमधील वाद वाढू लागले. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेताला. ब्रेकअप करताना तू मला शेवटची एकदा तरी भेट असा हट्ट प्रियकराने प्रेयसीकडे केला. पाणावलेल्या डोळ्यांनी दोघेही एकमेकांना भेटले. मात्र काही वेळातच चित्र बदललं. तरुणाने आपला खरा रंग दाखवला.

त्याने धारधार शस्त्राने प्रेयसीवर वार केले. यात ती खाली कोसळली. तिच्या मानेवार वार केल्याने या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला.यानंतर तरुणाने आपल्या हातावर देखील चाकूने वार केला आणि तोही तरुणीच्या शेजारी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या दुर्दैवी घटनेत तरुणीला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT