Amravati Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Crime : विवाहित महिलेला जंगलात नेलं, हातपाय बांधले अन्.., काळीमा फासणारी घटना

२५ वर्षीय विवाहित महिलेचं अपहरण करून तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Amravati Crime News : अमरावती जिल्ह्यातून एक संतापजक घटना उघडकीस आली आहे. एका २५ वर्षीय विवाहित महिलेचं अपहरण करून तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार करण्यात आला आहे. मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यात ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

हिरालाल जमुनकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, चिखलदरा (Amravati) तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिला मोलमजुरी करते. नेहमीप्रमाणे ती काम करण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी वाटेतच आरोपी हिरालाल याने तिचे अपहरण  (Crime News) केलं. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला जंगलात नेऊन डांबून ठेवलं.

इतकंच नाही तर, आरोपीने पीडितेचे साडीने हातपाय बांधून तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार देखील केला. ही संतापजनक घटना ९ ते १२ डिसेंबर दरम्यान घडली. दरम्यान, पीडित महिलेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी हिरालाल जमुनकर याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT