Amravati Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Amravati News: ११ तरुणी, ३४ तरुण अन् वॉटर पार्कमध्ये रंगली बेधुंद पार्टी, मध्यरात्री पोलिसांची धाड; ४५ जणांना अटक

Amravati Breaking News: अमरावतीच्या वरुडपासून काही अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलात हे नेचर प्राईड रिसोर्ट आणि वॉटर पार्क आहे. पोलिसांनी धाड टाकत एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती, ता. २४ मे २०२४

पुण्यातील हिट अँड रन केस प्रकरणानंतर शहरातील पब, बार आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर मध्यप्रदेश पोलिसांनी धाड टाकली असून ३४ पुरुष आणि ११ महिलांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या एका रिसोर्टवर मध्यप्रदेश पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईमध्ये अश्लिल नृत्य करताना नागपुरमधील महिलांना पकडण्यात आले. या धडक कारवाईमध्ये तब्बल ३४ पुरुष आणि ११ महिलांना अटक करण्यात आली आहे.

अमरावतीच्या वरुडपासून काही अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलात हे नेचर प्राईड रिसोर्ट आणि वॉटर पार्क आहे. या रिसोर्टवर मध्यप्रदेशच्या मूलताई पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. अश्लिल नृत्य, धिंगाणा, मोठ्या आवाजात डीजेवर गाणी असा प्रकार या रिसोर्टमध्ये सुरू होता. यावेळी एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली.

या रिसोर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी अटक केल्या आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुडमधील दोन आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पुण्यातील पब संस्कृतीविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आता विदर्भामध्ये उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका

रोहित आर्य प्रकरणी मोठी अपडेट, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची होणार चौकशी, VIDEO

रथोत्सवाला आई-वडिलांना घेऊन गावी आला; घरामागे उभा असताना बंदुकीच्या गोळीनं घेतला वेध, थेट छातीत घुसली!

Kurkuri Bhendi: मुलांच्या डब्ब्यासाठी झटपट बनवा कुरकुरी भेंडी, सिंपल रेसिपी करा फॉलो

Mumbai Tourism : मुंबईत विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण, ऑफिसमधून थकून आल्यावर 'येथे' नक्की जा

SCROLL FOR NEXT