Amravati Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Amravati News: नवनिर्वाचित खासदारांचे बॅनर फाडल्याने राडा, भाजप- मविआचे कार्यकर्ते आमने-सामने; ठाकरे गटाकडून 'अमरावती बंद'चा इशारा!

Amravati Latest News: अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदारांचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला. यावरुन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. १० जून २०२४

अमरावती शहरातील राजकमल चौकात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपने जल्लोषात खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडले. या प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अमरावतीच्या राजकमल चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडले. या घटनेवर संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे नेते सुधीर सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत राजकमल चौकात ठिय्या देत आंदोलन करत पोलिसांना जाब विचारला.

यावेळी भाजप कार्यकर्ते व ठाकरे गट कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बॅनर फाडल्याप्रकरणी 20 भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 24 तासात बॅनर फाडणाऱ्या आरोपींना अटक केली नाही, तर उद्या अमरावती जिल्हा बंद करू व याचा निषेध करू असा इशारा ठाकरे गटाचे सुधीर सूर्यवंशी यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली. तसेच रात्री उशिरापर्यंत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. पोलीस व मनपाने रात्री भाजपने व इतर पक्षाने लावलेले बॅनर देखील काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडच्या देगलूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवरांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

SCROLL FOR NEXT