Amravati Accident Saam tv
महाराष्ट्र

Amravati Accident : शेतमजुरांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली; अपघातात १० शेतमजूर जखमी

Amravati News : तिवसा सार्शी मार्गावर हा अपघात घडला आहे. सध्या शेती कामांना वेग आला असून मिळतील तेवढे मजूर घेऊन शेतकरी शेतातील कामे पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तिवसा येथील प्रवासी रिक्षा वाहनाने गावातील शेतमजूर घेऊन जात असताना रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षामध्ये बसलेले १० शेतमजूर जखमी झाले असून यात ५ शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत.  

तिवसा सार्शी मार्गावर हा अपघात (Accident) घडला आहे. सध्या शेती कामांना वेग आला असून मिळतील तेवढे मजूर घेऊन शेतकरी शेतातील कामे पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. शेतात मजुरांना घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यानुसार तिवसा येथील शेत मजुरांना घेऊन आटो रिक्षा सकाळी मार्गस्थ झाली होती. मात्र रस्त्यावर समोरून अचानक कुत्रा आल्याने (Amravati) चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रोडचा खाली उतरून सिमेंट नालीवर धडकले.

शेताकडे जात असताना वाहना समोर कुत्रा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला वाहन सिमेंट नालीला धडकले. या अपघातात रिक्षात बसलेले १० मजूर जखमी झाले आहेत. यातील ५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT