Sangali News Saam TV
महाराष्ट्र

Sangali News: मयत व्यक्तीच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब; एसबीआय बॅंकेतील खळबळजनक घटना उघडकीस

मयत व्यक्तीच्या बँक खात्यावरील 21 लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

विजय पाटील

Sangali News: सांगलीच्या मिरजेत चक्क मयत व्यक्तीच्या बँक खात्यावरील 21 लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्टेट बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापका विरोधात महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest State Bank News)

मिरज पंढरपूर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे खातेदार असलेले रघुवीर कुमार रतन हे मूळचे बिहार मधील आहेत. काही वर्षांआधी ते मिरज येथील म्हाडा कॉलनी येथे राहत होते. दिनांक 11 मार्च 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मयत असताना त्यांच्या बँक खात्यावरील जमा असलेली एकूण रक्कम 21 लाख 28 हजार 364 रुपये काढण्यात आले. तत्कालीन बँक व्यवस्थापक अनिल साळे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे समजले आहे. साथीदार अवधूत पाटील यांच्याशी इतरांच्या खात्यावर सदरची रक्कम वर्ग करून तसेच वरील रकमेचा अपहार करून बँकेची फसवणून केल्याचे समोर आले आहे.

याबाबत सध्याचे बँक मॅनेजर मयूर चंद्रशेखर येळमल्ली यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. बॅंकेचे कामकाज पाहत असताना सदर बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी याची पूर्ण माहिती मिळवली आणि पोलीस ठाणे गाठले. महात्मा गांधी चौक पोलिसात तत्कालीन बँक व्यवस्थापक अनिल साळे आणि अवधूत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. तर याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT