Minister Mangalprabhat Lodha’s controversial ‘Devabhau’ statement sparks heated political reactions across Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

Mahayuti Clash: सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात; मंत्री लोढांच्या वक्तव्याचा अमोल मिटकरींकडून समाचार

Amol Mitkari Vs Mangal Prabhat Lodha: महायुतीत टोकाचे मतभेद झालेले असताना भाजपच्या मंत्र्यांचं खळबळजनक विधान समोर आलंय. मंगलप्रभात लोढांच्या राजकीय विधानाने महायुतीत पुन्हा टिका-टिप्पणी सुरु झाली आहे. तर विरोधकांनी खास शैलीत लोढांच्या टीकेला उत्तर दिलंय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

  • मंगलप्रभात लोढांच्या ‘देवाभाऊ पक्ष चालवतात’ या विधानाने महाराष्ट्रात खळबळ उडालीय.

  • अमोल मिटकरींनी लोढांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

  • महायुतीत मतभेद वाढू लागलेत.

महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष कसे चालवायचे हे देवाभाऊ ठरवतात, हे वक्तव्य आहे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतूक करतानाच लोढांनी हे वक्तव्य केलं आणि राज्यात एकच खळबळ उडालीय. तर अजित पवार आणि सर्वसामान्य कार्यकर्ते वगळता इतरांनी आमचा पक्ष चालवायची गरज नाही, असा टोला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लगावलाय. दुसरीकडे विरोधकांनीही लोढांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय.

खरंतर शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी फडणवीस चालवत असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी वारंवार केलंय. तर काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेसेनेचे अनेक नेते महायुती सरकारच्या धोरणांचा विरोध करतात आणि प्रत्यक्षात मात्र भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच ठेवतात. लोढांच्या वक्तव्यानं आतापर्यंत झाकलेली मूठ उघडली गेलीय का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक जनहिताच्या मुद्द्यावर महायुती सरकारला कितपत खिंडीत गाठणार. यावर विरोधकांचीही विश्वासार्हता ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : खोटे शिक्के घेतले, कागदपत्रे तयार केली; पुणे महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला बेड्या

Tulsi Leaves Face Pack: थंडीत मऊ आणि चमकदार त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा फेसपॅक कसा बनवायचा?

Dhurandhar Collection : बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा बोलबाला; 'धुरंधर'नं पहिल्याच दिवशी 'सैयारा', 'पद्मावत'ला पछाडलं, कमाई किती?

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० प्रेरणादायी विचार

Dr Babasaheb Aambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनापूर्वीच्या २४ तासांत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT