Amit Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

माझ्या पप्पाला आणून द्या, बाळासाहेबांच्या लेकीने टाहो फोडला, अमित ठाकरेही रडले

Amit Thackeray : सोलापूरमध्ये बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडका लावला आहे. या घटनेनंतर अमित ठाकरे यांनीही कुटुंबीयाच्या भेटीसाठी सोलापूर गाठलं.

Vishal Gangurde

सोलापूरच्या मनसे नेत्याच्या हत्येने संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी देखील कारवाईला सुरूवात केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ११ जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मनसे नेते अमित ठाकरे देखील पीडित कुटुंबाच्या भेटीला पोहोचले. यावेळी बाळासाहेबांच्या लेकीने अमित ठाकरे यांच्यासमोर टाहो फोडला.

सोलापूरच्या मनसेचे विद्यार्थी सेनेच्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात कारवाईचा सपाटा लावला आहे. या हत्या प्रकरणात फरार असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी पीडित कुटुंबीयांकडून केली जात आहे.

या घटनेनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूर गाठलं. अमित ठाकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बाळासाहेबांच्या लेकीने रडत रडत अमित ठाकरेंकडे न्यायाची मागणी केली. माझ्या पप्पांना मला आणून द्या, असं म्हणत लेक अमित ठाकरेंसमोर रडली. संपूर्ण कुटुंबीयांनी टाहो फोडल्यानंतर अमित ठाकरे यांनाही रडू कोसळले.

पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली?

सोलापूर पोलिसांकडून माजी नगरसेविका शालन शिंदेंसह १५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी माजी नगरसेविका शालन शिंदे आणि आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे या चौघांना शुक्रवारी रात्रीच अटक करण्यात आली होती. या हत्येनंतर आतापर्यंत फरार असलेल्या माजी नगरसेवक शालन शिंदे यांचे पती शंकर शिंदेंसह 11 आरोपीना पोलिसांनी अटक केली.

बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील या सर्व 11 आरोपींना आज न्यायलयात हजर केलं जाणार आहे. आधी अटकेत असलेल्या माजी नगरसेविका शालन शिंदे यांना दोन दिवसांची तर आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे चार दिवसाची पोलिस कोठडी काल न्यायालयाने सुनावली होती. आज शंकर शिंदेसह 11 आरोपीना न्यायालय किती दिवसाची कोठडी सुनावणार हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT