केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय...एकीकडे अमित शाहांनी अजित पवारांनी भूमिकेचे कौतुक केले, तर दुसरीकडे ठाकरेसेनेचे उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केलाय.. सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या शाहांनी पुतळा अनावरणापूर्वी नाक रगडून माफी मागायला हवी होती, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय...तर दुसरीकडे शाहांवरील टीकेनंतर शिंदेंनी आक्रमक पवित्रा घेत ठाकरे विश्वासघातकी असल्याची टीका केलीय.
दुसरीकडे दादांना अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनीही केलाय.. मात्र राऊतांच्या या आरोपाला भाजपानं प्रत्युत्तर दिलंय.
एकंदरीत, अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम एका बाजूला पार पडला असला, तरी महाविकास आघाडीने या मुद्द्यावरून भाजपला चांगलेच घेरलयंं... जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण करून देत उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केलेल्या या विधानांमुळे येत्या काळात भाजप- ठाकरेसेनेतील संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे...मात्र दादांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपावर भाजपनं अद्याप कुठलचं स्पष्टीकरण न दिल्यानं दादांवरचे आरोप राजकीय फायद्यांसाठी झाले होते का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.