Union Home Minister Amit Shah addresses a rally in Kolhapur, asserting that Eknath Shinde’s faction represents the “real Shiv Sena,” intensifying the political battle in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, अमित शाहांनी ठाकरेंना डिवचलं

Amit Shah On ShivSena Real Party Shinde Vs Thackeray Row: शिवसेनेतील चार वर्षां पूर्वीच्या बंडानंतर आजही शिवसेना नक्की कोणाची असा प्रश्न सर्व स्तरावर विचारला जातोय. एकीकडे दोन्ही पक्षांची न्यायालयीन लढाई सुरु असतानाच अमित शाहांनी ठाकरेंना डिवचलं. कोल्हापूरच्या दौऱ्यात अमित शाहांनी शिवसेनेवर काय मोठं वक्तव्य केलंय ? पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

शिवसेनेतील चार वर्षां पूर्वीच्या बंडानंतर आजही शिवसेना नक्की कोणाची असा प्रश्न सर्व स्तरावर विचारला जातोय. एकीकडे दोन्ही पक्षांची न्यायालयीन लढाई सुरु असतानाच अमित शाहांनी ठाकरेंना डिवचलं. कोल्हापूरच्या दौऱ्यात अमित शाहांनी शिवसेनेवर काय मोठं वक्तव्य केलंय ? पाहूया एक रिपोर्ट...

शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत असतानाच

शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण विचारला जातोय. शिवसेनेच्या साठीलाच ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यामुळे एकनाथ शिंदेचं राजकीय वजन वाढलं आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खऱ्या शिवसेनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना डिवचलंय...

तर कोर्टाचा निकाल अजून आलेला नाही, असं प्रत्युत्तर ठाकरेसेनेने दिलाय.

फोडाफोडीच्या राजकारणावरुन ठाकरे-शिंदे पुन्हा आमनेसामने आलेत. मुंबईत शुक्रवारी वर्धापन दिनाच्या मेळाव्यात त्याचे पडसादही उमटलेत. ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी शिंदेंना दिल्लीतील श्रेष्ठींचं बळ होतं हे उघड आहे. त्यात अमित शाहांनी कोल्हापूरात दौऱ्यात ठाकरेंना डिवचलंय. तर शाहांच्या दौऱ्यावरुन संजय राऊतांनी ट्विटमधून शिंदेंना टोला लगावण्याची संधी सोडलेली नाही.

मुंबईभर शाहांच्या स्वागताचे होर्डिंग्ज मिंधे सेनेने लावले आहेत. मोठी गंमत आहे ही, त्यांचे पक्ष प्रमुख येत आहेत. स्वागत तर होणारचं.

दोन्ही पक्षांचं संख्याबळ पाहिलं तर शिंदे सेनेचं पारडं जड आहे.

2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने एकूण 81 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 57 जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत 7 खासदार निवडून आलेत. तर ठाकरे सेनेचे 20 आमदार आणि नऊ खासदार असं राजकीय बळ आहे. मात्र त्या

शिवसेना फुटीचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबीत आहे. न्याय मिळत नसल्यावरुन ठाकरे सेनेने वारंवार सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. हा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे राज्याचं लक्ष असतानाच अमित शाहांचं विधान शिंदेंना मोठं बळ देणारं आहे. मात्र यापुढे ठाकरे सेनेची रणनिती आणि किती ताकदीने ते विरोधकांशी लढणार यावर भविष्यातील समीकरणं अवलंबून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पवनराजेंना कुणी मारलं? पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष

NEETचा गोंधळ संपता संपेना! नागपुरच्या विद्यार्थ्याला दिलं 'अबू धाबी'चं केंद्र

Maharashtra News Live Update: शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा...

Dombivli News : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; डोंबिवलीत मनसैनिक आक्रमक, थेट पोलीस ठाण्यावर धडकले

धुळे हादरलं! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT