केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. वरकरणी हा दौरा विकासकामं आणि अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वाटत असला तरी या दौऱ्यात पडद्यामागे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...त्यामुळेच पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल 40 ते 45 मिनिटं बंद दाराआड खलबतं झालेत...विशेष म्हणजे या बैठकीला शिंदेसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरही उपस्थित होते. त्यामुळे ओमराजेंचीच मंत्रिपदी वर्णी लागणार की काय अशी चर्चा आता राजकीय विश्वात रंगू लागलीय. त्यात शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी ही शाहांच्या दौऱ्यात इतर समीकरणांची जुळवाजुळव सुरु असल्याचं सांगून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिलेत...
दरम्यान पुण्यात शाहांच्या स्वागतासाठी शिंदेसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली...जागोजागी भाजपपेक्षा शिंदेसेनेचेच जास्त बॅनर लागलेत... त्यात शिंदेसेनेच्या एका बॅनरवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा फोटो झळकल्यानं एनडीएत शिंदेसेना कशी विश्वासू आहे हेच दाखवण्याचा प्रयत्नही शिंदेंकडून करण्यात आला...
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही अमित शाहांची भेट घेतली... सुनेत्रा पवार थेट अमित शाह मुक्कामी असलेल्या जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्येच पोहचल्या... त्यामुळे दादांची राष्ट्रवादीही केंद्रातल्या मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं समजतंय. केंद्रीय मंत्रिपदासाठी दादांच्या राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंमध्ये स्पर्धा आहे...मात्र तटकरेंच्या घरात आमदारकी आणि राज्यातील मंत्रीपद असल्यानं पटेलांचा दावा अधिक मानला जातोय... मात्र त्यांना खासदार पार्थ पवारांचा अंतर्गत विरोध असल्याची चर्चा आहे.
एकूणच,विलिनीकरण आणि 'ऑपरेशन टायगर'च्या नावाखाली सुरू असलेल्या या खलबतांचा खरा धमाका लवकरच दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या रूपाने पाहायला मिळणार का? शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आणि कुणाला डच्चू मिळणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.