Beed, farmers, fake currency, ambhora police station saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : बनावट नोटा देऊन शेतकऱ्याला घातला गंडा; अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अंभोरा पोलिस घटनेचा शाेध घेताहेत.

विनोद जिरे

Beed Crime News : एका शेतकऱ्याकडून पाठबोकड विकत घेऊन खेळण्यातील बनावट नोटा देत फसवणूक करून दोघांनी पोबारा केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेतकरी संतापले आहेत. (Maharashtra News)

बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या कड़ा देवळाली रोडवरील डोंगरगण येथे नभाजी भाऊ घोडके यांचे घर आहे. त्यांच्याकडे 6 शेळ्या आहेत. त्यांच्याकडे दोन जण शेळ्यांचे व्यापारी म्हणून दुचाकीवरून घरी आले.

पाठबोकड विकायचे आहे का ? असं बोलताच घोडके हो म्हणाले. शेळी, पाठबोकड असा दोन्ही मिळून साडेनऊ हजार रुपयांत सौदा झाला. पत्नी कुसुम घरात चहा करत असताना एकाने आत जाऊन पैसे दिले. पत्नीकडून पैसे मोजण्यासाठी हातात घेताच 2 हजारांच्या 4, तर पाचशेच्या 3 अशा साडेनऊ हजारांच्या खेळण्यातील बनावट नोटा दिल्याचे नभाजी भाऊ घोडकेंच्या लक्षात आले.

तोपर्यंत व्यापाऱ्यांनी पोबारा केला होता. बनावट नोटा देऊन गंडा घातल्याने शेतकरी कुटुंबाला रडू आवरत नव्हते. दरम्यान याप्रकरणी बीडच्या अंभोरा पोलिस ठाण्यात (ambhora police station) अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT