Shinde Sena and BJP leaders signal possible alliance in Ambernath after months of intense political clashes. Saam tv
महाराष्ट्र

आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली? अंबरनाथ पालिकेत शिंदेसेना-भाजपची युती?

Ambernath Politics ShindeSena Bjp Alliance Power Struggle: अंबरनाथ नगरपालिकेत सध्या सत्तेचा असा काही 'अजब खेळ' सुरूय, जो पाहून मतदारही चक्रावून गेलेत. कधी एकमेकांची डोकी फोडली तर कधी एकमेकांना कोर्टातही खेचलं.. मात्र, आता सत्तेसाठी कट्टर विरोधक एकमेकांच्या गळ्यात गळे घालतायत? नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

ही दृश्ये नीट पाहा... ही दृश्ये आहेत अंबरनाथ नगरपालिकेत सत्तास्थापनेवरून झालेल्या भाजप आणि शिंदेसेनेच्या राड्याची...एकमेकाची डोकी फोडायला निघालेल्या या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी आता सत्तेसाठी गळ्यात गळे घालण्य़ाची तयारी सुरू केलीय. खंरतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालानंतर नगरपालिकेत शिंदेसेनेच्या पारड्यात बहुमत असतानाही शिंदेसेनेनं भाजपला युतीचा नवा प्रस्ताव शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिलाय. त्यामुळे युतीची चर्चा रंगलीय.

अंबरनाथ पालिकेत सत्तेचं गणित कितीदा बदलणार?

अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर एक अपक्षाच्या मदतीने शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं होतं. भाजपचे 16 नगरसेवक असून काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी थेट भाजपात प्रवेश केला. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 32 गेलं. मात्र, यात पुन्हा मोठा ट्विस्ट आला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदेसेनेच्या तंबूत दाखल झाले. त्यामुळे शिंदेसेनेनं बहुमताचा आकडा पार केला.

तरीही शिंदेसेनेला भाजपची का गरज भासतेय हा खरा प्रश्न आहे. कारण शिंदेसेना आणि भाजप एकत्र आले तर अंबरनाथ पालिकेत विरोधकच शिल्लक राहणार नाही. असं असलं तरी अंबरनाथमधल्या शिंदेसेनेच्या काही नेत्यांना हा निर्णय़ मान्य नाही. त्यामुळे शिंदेसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आलाय. तर भाजपनं पक्षातल्या वरिष्ठांकडे बोट दाखवत आपले पत्ते झाकून ठेवले आहेत.

गेल्या पाच महिन्यांपासून शिंदेसेना आणि भाजपात सत्तासंघर्ष सुरू आहे. यासाठी कधी राडा झाला तर कधी एकमेकांना कोर्टात खेचलं. मात्र आता सत्तेसाठी सगळे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. युती करायचीच होती तर मग इतर पक्षांची फोडाफोडी, नगरसेवकांची खेचाखेची कशासाठी सुरू होती? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

तामिळनाडूत शिवसेना स्टाईल बंड, अम्माच्या पक्षात उभी फूट

नवरा-बायकोमधील वाद टोकाला भिडला,पतीनं पत्नीचा गळा चिरला अन्...; दुहेरी हत्याकांडानं नांदेड हादरलं

मोदींच्या आवाहनाविरोधात पवार-ठाकरे आक्रमक, 'चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?'

Maharashtra News Live Update: - महागडा मोबाईल नदीपात्रात पडला, थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री राबवली शोधमोहीम

SCROLL FOR NEXT