Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : उल्हासनगरात ८६ हजारांचा गुटखा जप्त; चार जणांना ठोकल्या बेड्या

उल्हासनगरात ८६ हजारांचा गुटखा जप्त; चार जणांना ठोकल्या बेड्या

अजय दुधाणे

अंबरनाथ : उल्हासनगरमध्ये ८६ हजारांचा गुटखा अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी (Police) जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून शहरात गुटख्याचा अवैध पुरवठा करणाऱ्या (Ambarnath) गुटखामाफियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Tajya Batmya)

उल्हासनगरमधील (Ulhasnagar) मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहाड फाटक परिसरात खुलेआम गुटखा विक्री केले जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता दीपक ठाकूर आणि संदीप साळवे यांना मिळाली होती. मात्र या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या गुटखा माफियावर कारवाई करत नसल्याने अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या पथकाने या परिसरात धाड टाकत ८६ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

या प्रकरणात नवनीत चौरसिया, नवजीस अन्सारी, आलीत खान आणि इतर एक आरोपी असे एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तर या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठोडी हजर केले असता या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित गुटखा कोणाकडून विक्री करण्यासाठी आणण्यात आला होता. त्याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत. मात्र उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांचे पथक धडक कारवाई करते. मात्र अश्या अवैध धंद्याकडे उल्हासनगर पोलीस हेतूपुरस्कार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT