Ambarnath Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Crime : महिलेचा पाठलाग करत काढली छेड; नागरिकांकडून रोडरोमिओला चोप

Ambarnath News : राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटना थांबत नसून आता रस्त्यावर देखील सर्रासपणे छेडखानी केली जात आहे. अंबरनाथमध्ये असाच प्रकार समोर आला आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : रस्त्यावरून जाणाऱ्या महिला व मुलींची सर्रासपणे छेड काढली जात असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. अशीच घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा पाठलाग करत छेड काढली होती. छेड काढणाऱ्या रोडरोमियोला स्थानिक नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. 

राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटना थांबत नसून आता रस्त्यावर देखील सर्रासपणे छेडखानी केली जात आहे. अंबरनाथमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. दरम्यान अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगर भागात पीडित महिला वास्तव्याला आहे. सदर महिलेला दररोज हा रोडरोमिओ तिला बघत उभा राहायचा. दरम्यान या रोडरोमिओने आपली हिंमत वाढवत महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या घरापर्यंत पोहोचला. इतकेच नाही तर महिलेची छेड देखील काढली. 

पती, नागरिकांनी दिला चोप 

घरापर्यंत पोहचत छेड काढल्याबाबत महिलेने आपल्या पतीला याची माहिती दिली. तर घडला प्रकार काही नागरिकांनी देखील पहिला होता. यामुळे या प्रकारानंतर महिलेचा पती आणि स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच पोलिसात याबाबत तक्रार देखील दिली. 

मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी फक्त एनसी नोंदवून घेत या रोडरोमिओला सोडून दिल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. यानंतर हा रोडरोमिओच्या पुन्हा तिथेच चकरा सुरू झाल्या आहेत. यामुळे ही महिला आणि तिचं कुटुंब दहशतीच्या छायेत आहे. त्यामुळं पोलिसांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT