Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : हरणाच्या शिकारीचा प्रयत्न; अंबरनाथ एमआयडीसी परिसरात आढळले जखमी दुर्मिळ जातीचे हरीण

Ambarnath News : पहाटेच्या सुमारास अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील एका कारखान्याजवळ हे हरीण एका कामगाराला जखमी अवस्थेत आढळून आले

अजय दुधाणे

उल्हासनगर : अंबरनाथमध्ये पिसुरी जातीच्या दुर्मिळ हरणाच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळ्या लागून जखमी अवस्थेत असलेले हरीण अंबरनाथ एमआयडीसी भागात आढळून आले होते. या नंतर त्याला उपचारांसाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं आहे.

पिसुरी जातीचं हे हरीण संरक्षित प्रजातीत मोडतं. रविवारी पहाटेच्या सुमारास (Ambarnath News) अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील एका कारखान्याजवळ हे हरीण एका कामगाराला जखमी अवस्थेत आढळून आले. याबाबत त्याने लागलीच प्राणीमित्र आणि वन विभागाला (Forest Department) माहिती दिली. यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत हरणाला ताब्यात घेतलं. यावेळी हे हरिण गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला उपचारांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं. 

हरणाच्या शरीरात ५ गोळ्या 

याठिकाणी हरणाची तपासणी केली असता त्याच्या शरीरात ५ गोळ्या आढळून आल्या. त्यामुळे दुर्मिळ प्रजातीच्या या हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. आता त्याच्या शिकारीचा प्रयत्न नेमका कोणी केला? याचा तपास वन विभागाकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT