Ambarnath Police Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : संतापजनक.. स्पेलिंग न आल्याने ७ वर्षांच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Ambarnath News : अंबरनाथमधील साऊथ इंडियन या शाळेत विद्यार्थाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : शाळेमध्ये मुलांना स्पेलिंग पाठ करण्यासाठी दिले असताना विद्यार्थ्याला इंग्रजी शब्दाची स्पेलिंग आली नाही. या कारणाने शिक्षिकेने दुसरीत शिकणाऱ्या ७ वर्षीय विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंबरनाथ पश्चिमेच्या साउथ इंडियन शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. मुळात शाळेत मुलांना मारहाण करण्यास शासनाने मनाई केली आहे. अंबरनाथमधील साऊथ इंडियन या शाळेत विद्यार्थाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या शाळेत दुसरीच्या वर्गाच्या शिक्षिकेने मुलांना स्पेलिंग पाठ करण्यास दिले होते. मात्र वर्गातील एका विद्यार्थ्याला एका इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग आले नाही. 

स्पेलिंग बोलता न आल्याने त्याची वर्गशिक्षिका विजयश्री शकेवार हिने त्याच्या पाठीवर आणि पायावर काठीने अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या पाठीवर आणि पायावर काठीचे मारल्याच्या खुणा उमटल्या आहेत. दरम्यान मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर गप्प गप्प असल्यामुळे आईने त्याला जवळ घेऊन विचारपूस केली. यानंतर मुलाने आईला शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

मुलाने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षिका विजयश्री शकेवार हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यामुळे आता या शिक्षिकेला जेलमध्ये जावं लागणार आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Nashik : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला, सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर

Ranjangaon Tourism: एप्रिल-मे सुट्ट्यांसाठी परफेक्ट प्लॅन, पुण्याजवळची ही प्रसिद्ध धार्मिक ठिकाण नक्की पाहा

नवऱ्याला सोडून पळाली मोनालिसा? नवरा फरमान मोनालिसाच्या शोधात?

Rice Idli Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा शिळ्या भाताची मऊसूत इडली, अवघ्या १० मिनिटांत बनेल रेसिपी

SCROLL FOR NEXT